Comedy story – जॉब

आज bus stop वर अनुज, मनोज, प्रताप बराच वेळ थांबले होते, कंपनीची बस आज लेट झाली म्हणून आतुरतेने वाट पाहत होते. अनुजला आज प्रोजेक्ट रीपोर्ट सबमीट करायचा होता, तो त्याचा जास्त विचार करत नव्हता. मनोजला पण त्याची बरीचशी कामं मार्गी लावायची होती आणि आज Manager बरोबर मीटिंग होती. प्रताप रोज कामाचा प्रताप करायचा कारण त्यानं कालची सगळी corrections, overtime मध्ये केली होती. Manager यायच्या आत त्याच्या टेबल वर रीपोर्ट जायला पाहिजे. या विचारात त्याने मनातल्या मनात revision चालू केली होती.
सगळ्यांची ओळख थोडक्यात सांगायची झाली तर, अनुज, smart, मनमौजी आणि मिश्कील स्वभावाचा होता, तो कायम एखाद्या कामाचे रिझल्ट्स वर्स्ट धरून चालायचा पण त्याचं नशीब कायम त्याला बेस्ट रिझल्ट्स द्यायचं. मनोज, काम थोडं पण सोंगं जास्त. हवा करायला सगळ्यात पुढे, “हार्ड वर्क केल्याशिवाय पर्याय नसतो” एवढंच त्याचं ठरलेलं वाक्य. प्रताप, नसलेलं टेन्शन घेऊन सगळ्या गावाला टेन्शन देणारा, पार्टीच्या दिवशी चढली की हा राजा आणि बाकी प्रजा, याला कायम वाटायचं कंपनी त्याच्यामुळेच चालू आहे. तिघेही इंजीनीर आणि इकाच कंपनीत.
एवढ्यात एक smart मुलगी येताना दिसली आणि तिघेही बोलायचं थांबले. सगळे बघत उभे. तिनं कंपनीची बस गेली का विचारलं, अनुजने “नाही, मीपण तिचीच वाट बघतोय.” असं सांगितलं. या दोघांना राग आला आपल्या अगोदर बोलला म्हणून. मनोज ह्यांग झाल्यासारखा बघत होता तर प्रताप जास्तच सिरीअस झाला होता. मनोजनं विचारलं, “तुम्ही फ्रेशर आहात काय? पहिलाच जॉब?” पुढचा लगेच त्यानं प्रश्न केला, “joining आज आहे काय?” तिनं हो म्हणून सांगितलं. प्रतापनं कॉलेज कोणतं विचारलं कॉलेजच नाव काहीतरी वेगळं आईकायला मिळालं. अनुजला बरं वाटलं कारण ती आपल्याच कॉलेजची नाही म्हणून. मनोज म्हणाला आम्हालापण एकच वर्ष झालंय जॉईन करून. त्यावर अनुजने हसून प्रतिक्रिया दिली की तरीपण हे फ्रेशरसारखे वागतात. सगळेजण हसू लागले आणि तेवढ्यात बस आली. बसमध्ये चढताना सगळ्यांनी सभ्य माणसांसारखं तिला अगोदर जाऊ दिलं. बसमध्ये चढताना मनोज म्हणाला, “ए अनुज जास्त भाव मारून जाऊ नकोस हं” लांब राहायचं.
बस कंपनीत गेल्यावर सगळेजण एकदम शिस्तीत ओळीने उतरून जात होते. हे बघून अनुज म्हणाला, “मलातर school bus च आठवते”. मनोज म्हणाला, “चला, गाढवासारखं काम करायला सगळेजण तयार राहा, खूप हार्ड वर्क करावं लागतं” प्रतापनं यावर reaction दिली, “गाढव असशील तू, चल पुढं, तुम्हाला काय कामाचं टेन्शन आहे का रे? ते जाउद्या सगळं, आज भेटलेल्या मुलीचं नाव काय होतं?”, मनोज लगेच बोलला, “इंडक्शनला समजेल.” अनुजने दोघांना शांत करत, एक बागेत काम करणारा माळी दाखवला आणि बोलला, “काम असं असावं कशाचाही लोड नाही, रोज फक्त पाणी देणे, बागेची निगा राखणे, नको नवीन प्रोजेक्ट, नको त्या मिटींग्स, नको दिखाऊपना.”
इंडक्शनला तिचं नाव समजलं “जुई” आणि प्लान्निंग department ला जॉयनिन्ग. लंच ब्रेकमध्ये ती त्यांच्या colleagues सोबत जेवायला गेली. हे तिघे एकत्र जाताना त्यांना ती दिसली, मनोजने हाय केलं आणि तिनं हेल्लो नं रिप्लाय देऊन त्यांच्यासोबत सगळ्यांना सेम टेबलवर जॉईन व्हायला सांगितलं. लगेच मनोज तिच्या शेजारच्या चेअर वर बसला. अनुज म्हणाला “अरे मन्या, चल सेल्फ सेर्विस विसरला काय?” मन्यानं लगेचच सांगितलं “माझीपण जेवणाची थाळी आन”, “जुई, हे माझे खूप जिवलग आहेत.” अनुज पुढे जात पुटपुटला, “तसाच उपाशी बस पण मी थाळी नाही आणून देणार”. प्रताप म्हणाला “ए मन्या पुढची आमची जागा धरून ठेव रे, मी तुझी थाळी आणतो.”
सगळेजण जेवायला लागले तसं जुईनं विचारलं, “मला एक नाव समजलं. पण हे मन्या काय म्हणताय, मनोज म्हणा नाहीतर लाडान मनी म्हणा” हे ऐकताच प्रतापला जोरात ठसका लागला, जुईनं लगेच पाण्याचा ग्लास ऑफर केला. “थ्यांक यू, मी प्रताप, पण सगळे लाडानं प्रतापराव म्हणतात.” अशी त्यानं ओळख करून दिली. हेच दोघेजण जुईला सारखे प्रश्न विचारत होते पाच मिनिटात दहा-पंधरा प्रश्न विचारले असतील. त्या प्रश्नांची उत्तरे देत देत जुई अनुजकडे बघत होती. ती म्हणाली “एक नाव सांगायचं राहिलंय, याला कमी बोलायला आवडतं काय, नाव सांग ना?” प्रताप म्हणाला, “जाउदे याचं नाव समजून घेउन काय करायचं? भाव खातो.” अनुजने लगेच reaction दिली, “माझं नाव आपोआपच तुला समजेल तरीपण सांगतो…” लगेच मनोजनं टोमणा मारला “हो, हा celebrity आहे इथला.” तेवढ्यात कुणीतरी आवाज दिला, “अनुज well done, तुझा report बघितला.” जुई बोलली “खरंच celebrity आहे अनुज.” मनोज आणि प्रतापराव आ वासून अनुजकडे बघत राहिले. अनुज ने तोंडात माशा जातील, तोंड बंद करा, असा जोक केला. त्या जोकला जुई हसतच राहिली.
सगळेजण काम आटोपून संध्याकाळी रूमवर परतले. मनोज एकटयाशीच हसत होता, त्याला मनी हे नाव खूप आवडलं आणि तो जुईच्या स्वप्नात रंगून त्याच्या बेडवर शांत पडून होता. प्रतापला ऑफर केलेला ग्लास आठवत होता. तोही तिचंच स्वप्न बघत होता. अनुज तिचे विचार मनात यायचं थांबवत होता आणि हे काम मनाविरुद्ध करत होता. मनोजने कुमार सानूची romantic songs लावली, repeat mode वर ठेउन ऐकत झोपला. प्रताप रफीची गाणी ऐकत ऐकत त्याला एक टेन्शन आलं होतं की, आता हे प्रकरण handle कसं करायचं.
बरेच दिवस हाच दिनक्रम चालू. प्रताप ने धाडस करून एकदा propose केलं. जुईनं नकार दिल्यावर याला सहन झालं नाही त्याच दिवशी पार्टी ठेवली. मनोजनं नादच सोडला होता जुईचा कारण त्याच्या मते इथ smart वर्क लागेल आणि ते काय जमणार नाही आणि काही क्लू पण मिळत नव्हते. संध्याकाळी हे तिघेजण पार्टीला बसले आणि प्रताप राजा झाला. तो म्हणत होता की, “माझ्या लेवलची नव्हती म्हणून जाउदे. मी स्वताची कंपनी चालू करेन तेव्हा समजेल. कशी पळत येईल, पण एकदा नाही म्हणजे नाही, आपण ठरवलंय आता, लय टेन्शन घ्यायचं नाही. एक गेली म्हणून काय झालं.” हे दोघे फक्त ऐकत होते. ऐकावच लागायचं नाही ऐकलं तर बिल द्याव लागायचं. अनुज ड्रिंक घेत नव्हता. मनोज झेपल तेवढीच घ्यायचा.
प्रतापने मनोजला तयार केलं आणि म्हणाला, “मनोज, तुला ती हो म्हणेल, तू उद्या विचारच” यावर मनोज म्हणाला, “माझ्यापेक्षा अनुजला चान्सेस आहेत.” प्रतापाने संपलेली एक बाटली उलटी करून टेबल वर ठेवत पुन्हा सुरुवात केली, “अरे त्याचं तिला बोलणं आवडत नाही, हा कसापण बोलतो, manners less, useless, not-परवडेबल ….हे असं मला इंग्लिश येतं मग.. राग आल्यावर… बरं.., अनुज माझं ऐक आता, हा लव्हर्स पेग तू घे.” अनुज म्हणाला sorry मी घेत नाही. प्रताप, “म्हणून मी तुला कुठे नेत नाही, ए मन्या हास.” “अरे, अनुज तुला या टोपनातलीपण प्यायला येत नाय काय? No use, जुई not impressed on you…”
दुसऱ्या दिवशी सकाळी मनोजची रंगीत तालीम चालू. मार्गदर्शन अनुजकडून. अनुजला राहून राहून वाटत होतं की याच्यागोदर आपणच propose करावं. थोडासा नाराज होता पण त्यानं ठरवलं की विचारायलाच नको. कंपनीत गेल्यावर coffee घेताना मनोज एकटा जुईजवळ गेला आणि म्हणाला;
“तुला काही बोलायचं आहे, रागावणार नाही ना?”
जुई : नाही, स्पष्ट बोल.
मनोज: मला तू आवडतेस.
जुई : I am engaged..
मनोज : काय!! कुणाबरोबर.
जुई : अनुज.
मनोज : त्यानं तुला विचारलंय?
जुई : नाही, पण तू सांग त्याला इथं coffee shop मध्ये भेटायला.
अनुजला समजल्यावर त्याला university topper आल्याचं फील झालं. दोघेजण भेटले, बोलले. काही दिवसातच दोघांच्या घरातून परमिशन मिळाली. पण अट एक होती. दोन वर्षात दोघानी मिळून दहा लाख बँक balance करायचा मगच लग्न करायचं आणि आता हे दोघे नुकतेच पास आउट झालेले इंजिनीर चालू पगारावर कसा balance करायचा या विचारात असतात.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *