Marathi Horror Story – रात्रीचा प्रवास

चार दिवसाच्या सुट्टीनंतर मला उद्या सकाळी लवकर ड्युटी जॉईन करायची होती. म्हणून मी आदल्या दिवशीच माझ्या बाईकवरून निघालो. जवळ जवळ अडीचशे किमी चा प्रवास मला करायचा होता. दिवस उन्हाळ्याचे होते. संध्याकाळी घरातून निघायला साडे सात वाजले. रस्ता तसा चांगला होता, चोरांची भीती नव्हती, पण शेवटचा ऐंशी किमी चा टप्पा हा घाटाचा, वळणा वळणाचा होता. कोकणातला रस्ता हा असाच असतो. दिवसा प्रवास करताना हिरवीगार झाडी, गवताची कुरणं, रहदारी नसलेला काळा आणि गुळगुळीत डांबरी रस्ता हे सर्वजन आपले मित्र वाटतात. पण हीच सगळी सोबती रात्रीच्या प्रवासात भीती दाखवत असतात. जेवढे झाड मोठे तेवढी भीती जास्त. मला आजपर्यंत भीती वाटण्यासारखा कसलाही प्रसंग ओढवला नाही. कॉलेजमध्ये असताना कितीतरी पैजा जिंकल्यात. म्हणून मी आज माझ्या आवडत्या बाईकवर निश्चिंत प्रवास करत होतो.
पहिला अडीच तासाचा प्रवास झाला, एका टपरीवर चहा घेतला. टपरी बंद व्हायचं टायमिंग झालं होतं. त्या टपरीवर एकच वयस्कर माणूस चहा आणि विडी घेऊन बसला होता. त्याचं एकदम लयबद्द काम चालू होतं, एक घोट, एक झुरका आणि एक वाक्य. मी चहाचा घोट घेत त्याला बघत होतो. तेवढ्यात त्यानं मला प्रश्न केला कुठे जाणार? मी सांगितल्यावर त्यानं रिप्लाय द्यायला तीस चाळीस सेकंद खाल्ली. त्यानं मला सांगितलं पुढे एवढ्या रात्रीचं जाण्यापेक्षा इथच कुठेतरी मुक्काम कर. मी म्हणालो आता एवढं अंतर कापलं आणि अजून दोन अडीच तासात मी पोहोचेन. त्या माणसाने मला थोडक्यात सांगीतलं की या रस्त्यावर बरंच काय काय घडलंय जरा जपून जा आणि कुणीही हात दाखवला तर गाडी थांबवू नको. मी त्याचे आभार मानले आणि पुढच्या प्रवासाला लागलो.
तासाभराचे अंतर कापता कापता मला रस्त्यावर दोन ठिकाणी, कुणीतरी एकटे फिरत असल्यासारखे दिसले, आजूबाजूला कुठेही लोकवस्ती नसताना! मी यावर जास्त विचारही केला नाही आणि कुठे गाडीही थांबवली नाही. कदाचित कुणीतरी वेडी मानसं असतील. जसं जसं पुढ जयील तसं तसं टपरीवरच्या माणसाचे बोल आठवायला लागले. माझ्या गाडीचा आवाज मला नको झाला वाटत होता कारण त्याच्या फायरीन्गणं आजूबाजूचा भाग सगळा जागा होत असेल असं वाटायचं. घाटाचा रस्ता चालू झाला होता, वळताना थोडा पाठीमागचा रस्ता दिसायचा, दरीकडे काही केल्याने लक्ष जायचं थांबत नव्हतं, हाताच्या मुठी घट्ट आवळून गाडीचं ह्यांडल पकडलं होतं, गाडीचा accelerator वाढवला की कुणीतरी मोठ्यानं गाणं म्हनाल्यासारखा आवाज यायचा आणि कमी केल्यावर आवाज बंद. रस्त्याच्या कडेनं गाडी चालवायला नको वाटत होतं कारण मोठमोठी झाडं अंगाचा पसारा करून मला पकडायची संधी बघत होती, गाडीच्या आरशात बघायला धाडसच होत नव्हतं, घाट असल्यामुळे गाडी चाळीसनेच पळत होती, मनात गाडी बंद पडायचीही शक्यता दाटून आली होती, समोरून पळत पळत एक ससा गेला, अगदी गाडीच्या जवळून, कुणी कशाच्या रुपात येईल सांगता येत नव्हते. एवढ्या गार वारयातही कानातून गरम हवा निघत होती. पाच पाच मिनिटाला मागे सीटवर कुणीतरी बसलंय असा भास होत होता.
पन्नासेक मीटर अंतरावर कुणीतरी गाडी थांबवण्यासाठी हात दाखवत होतं. मी जवळ जाईपर्यंत गाडी हळू घेतली, चाकं लटपटत होती आणि जवळ आल्यावर गाडी शक्य तेवढया वेगाने त्याला बगल देउन पळवली. आता मला वाटलं रस्ताचुकीचा फेरा चालू होईल. पण मला आता काहीच सुचत नव्हतं. अजून थोड्या अंतरावर एक माणूस रस्त्याच्या कडेला गाडी लावून हात करत होता मी गाडीचा वेग वाढवून चाललो पण तो रस्त्याच्या मधोमध येऊन दोन हात पसरून उभा राहिला. माझी गाडी आपोआपच थांबली तो हाथ जोडत हेडलाईट समोर आला मी उतरून उभा राहिलो त्याचा विचित्र चेहरा पाहून मी जोरात ओरडलो, तो म्हणाला घाबरू नकोस मी एक प्रवासी आहे, माझी गाडी बंद पडली म्हणून इथं बराच वेळ वाट बघत थांबलो. पुढे अर्ध्या तासावर माझं गाव आहे तिथपर्यंत घेउन चल. माझा विश्वासच बसत नव्हता पण त्याला घेऊन जान्याशिवाय पर्याय नव्हता. तो गाडीवर बसताच गाडी चालू केली. त्याचं नाव विचारल्यावर त्यान आन्ना हॉटेलवाला सांगितलं. तसेच त्याचं पुढच्या गावात हॉटेल आहे म्हणाला. तो बोलायचा बंद झाला, मी आरश्यात बघायचं धाडस करत नव्हतो. त्यानं माझ्या खांद्यावर हात ठेवले, बर्फासारखे गार वाटले.
पंधरा मिनिटं प्रवास झाल्यावर अजून एक माणूस पन्नासेक मीटर अंतरावर गाडी थांबवण्यासाठी हात दाखवत होता. तो माणूस रस्त्याच्या कडेला गाडी लावून हात करत होता. माझी गाडी आपोआपच थांबली. तो समोर आला, त्याचा विचित्र चेहरा पाहून मी जोरात ओरडलो तो म्हणाला घाबरू नकोस मी एक प्रवासी आहे, माझी गाडी बंद पडली म्हणून इथं बराच वेळ वाट बघत थांबलो. पुढे माझं गाव आहे तिथपर्यंत घेउन चल. मागून आवाज आला, आपण ट्रिपल सीट जाउ चल. गाडी पुन्हा रस्त्यावर पळू लागली. मी दहा मिनिट गप्प बसलो होतो. मी एक प्रश्न केला तुमचं नाव काय? (थोड्याश्या अंतरावर मला एक गाव दिसू लागलं जरा बरं वाटलं, पण अजून पाच मिनिट तरी लागणार होती त्या गावापर्यंत जायला.) त्यानं सांगितलं, आन्ना हॉटेलवाला…तसेच त्याचं पुढच्या गावात हॉटेल आहे म्हणाला. मी विचारलं दोघांचं एकच नाव कसं काय? तेव्हा तो म्हणाला, कोण दोघं? मी एकटाच तुझ्या गाडीवर बसलोय. मागे वळून बहितालं तर खरच एकटा!!!! त्यानं माझ्या खांद्यावर हात ठेवले, बर्फासारखे गार वाटले. मी कानात वारं गेल्यासारखं गाडी पळवत होतो. कसाबसा एका मंदिराजवळ आलो. तेव्हा तो ओरडला मला गावात सोड. मी गाडी पळवत मंदिर जवळ करत होतो. माझी गाडी धाडकन मंदिराच्या कट्ट्यावर आदळली. गाडीसोबत मीही पडलो, तो गायब, तसा मंदिराचा दरवाजा उघडला आणि पुजारी बाहेर आले. त्यांना सगळी हकीकत सांगितली. त्यांनी धीर दिला, मंदिरात झोपायला जागा दिली. सकाळी तोंड धूउन गावातल्या एका हॉटेलमध्ये चहा घेतला. पैसे द्यायला counter ला गेलो. हॉटेल चा मालक पैसे घेत होता, तेवढ्यात एका गिर्हैकाने आवाज दिला नमस्कार आन्ना हॉटेलवालं. मालकाने नमस्कार घातला. मी माझी गाडी घेऊन ड्युटीवर जाण्यासाठी पुढचा रस्ता धरला.

19 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *